image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
image01
 
 
Awareness and Training Materials

 

महाराष्ट्रातील आरोग्यसेवेच्या हक्कासाठी पाहणी व जनसुनवाई

सर्वसामान्य जनतेला किमान आरोग्यसेवाही न मिळण्याचे प्रमाण भारतात गेल्या काही वर्षात खाजगी व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात वाढले आहे. पैकी सार्वजनिक आरोग्यसेवेतील 'आरोग्यसेवा हक्क हनन' बाबत महाराष्ट्रातील 'आरोग्य हक्क अभियान'चा भाग म्हणून 2004 मध्ये सहा ठिकाणी जनसुनवाया झाल्या. त्यासाठी महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमधील 144 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 19 ग्रामीण रुग्णालये यांची एका प्रश्नावलीच्या आधारे 'जन आरोग्य अभियान' तर्फे पध्दतशीर पाहणी झाली. त्याची माहिती व निष्कर्ष थोडक्यात या पुस्तिकेत मांडले आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था यातून दिसून येते.

या केंद्रांमध्ये आरोग्यसेवा न मिळाल्याने ज्यांचे गंभीर शारीरिक/आर्थिक नुकसान झाले अशा निवडक 63 केसेस या जनसुनवायांमध्ये मिळून महाराष्ट्रातील जनतेपुढे आल्या. त्यांचेही विश्लेषण या पुस्तिकेत आहे. मानवी हक्क आयोगाच्या सहयोगाने भोपाळमध्ये जुलै 2004 मध्ये झालेल्या विभागीय जनसुनवाईत यापैकी 9 केसेसची कैफियत मांडण्यात आली. तसेच या पाहणीच्या आधारे स्पष्ट होणारी महाराष्ट्रातील ग्रामीण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुरावस्थाही मांडण्यात आली. या भोपाळ जनसुनवाईची व तिच्या पाठपुराव्याची माहितीही या पुस्तिकेत थोडक्यात संकलित केली आहे.

आरोग्य हक्क चळवळीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असलेली ही पुस्तिका आरोग्य-कार्यकर्त्यांना तर उपयोगी पडेलच. त्याचप्रमाणे सजग नागरिकांनाही ती वाचायला आवडेल.

7x 9.5, पृष्ठ संख्या - 40, प्रकाशन-2005, देणगी मूल्य 15/-

 

 

आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजन प्रक्रियेअंतर्गत माहिती पुस्तिका

"राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान" अंतर्गत आरोग्य विषयक स्थानिक गरजांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आरोग्यसेवांचे नियोजन विकेंद्रीत पध्दतीने करण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने 'आरोग्यसेवांचे विकेंद्रीत नियोजन' हा प्रशिक्षण कोर्स 'साथी' संस्थेमार्फत ठाणे, उस्मानाबाद, नंदूरबार, अमरावती, पुणे या 5 जिल्ह्यातील लोकाधारित देखरेख प्रक्रियेतील संस्था-संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत राबवण्यात आला. यासोबतच 5 जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांचाही सहभाग या कोर्समध्ये घ्यायचे ठरले होते व त्यांच्यासोबत पुढील वर्गाच्या आरोग्यसेवांचा नियोजन कृती आराखडयामध्ये (घ्क्ष्घ्) अधिक चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकतील कशाप्रकारे या कोर्सचे नियोजन करण्यात आले.

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कार्यकर्त्यांची, आरोग्य कर्मचारी तसेच स्थानिक पंचायत राज लोकप्रतिनिधींची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थानिक पातळीवर आरोग्यसेवांवर विकेंद्रीत नियोजनाची समज वाढवून स्थानिक आरोग्यसेवांच्या नियोजनामध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठीची क्षमता वाढवणे हा या कोर्सचा मुख्य प्राथमिक उद्देश आहे.

विकेंद्रीत माहितीवर आधारित आरोग्याचे नियोजन करताना आपापल्या परिसरात आरोग्याची स्थिती कशी आहे हे जाणून घ्यावे लागते. त्या आधारे माहितीवर आधारित विकेंद्रीत आरोग्याचे नियोजन करताना कार्यकर्ता म्हणून आपली काय भूमिका असावी यास मार्गदर्शक म्हणून या संदर्भातील माहिती होण्यासाठी खालील माहिती पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत.
1) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची रचना व सद्यःस्थिती यांची तोंडओळख
2) दृष्टिकोन विकास: आरोग्य हक्क, समता व समानता, लिंगभाव
3) आरोग्यसेवांच्या विकेंद्रीत नियोजनातील लोकसहभाग
4) आरोग्यावर परिणाम करणारे सामाजिक घटक
5) आरोग्यसेवांवरील नियोजनामध्ये माहितीचे महत्त्व व उपयोग
6) विकेंद्रीत नियोजन संकल्पना, दृष्टिकोन व जिल्हा आरोग्य नियोजनाचे-महत्त्व

8.5 x 11

 

 

करूया आरोग्य संवाद!

आरोग्यसेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी 'आरोग्य संवाद' ही एक तशी नवीन पध्दत गेल्या काही वर्षामध्ये आकारली आहे. तिची ओळख करून देणारी ही पुस्तिका.

आरोग्य समस्यांबद्दलची उदासीनता झटकून नागरिकांनी आपसात तसेच आरोग्यसेवा देणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, खासगी डॉक्टर्स, त्यांच्या संघटना यांच्याशी चांगल्या आरोग्यसेवासांठी संघटितपणे संवाद करणे म्हणजे आरोग्य संवाद. या आरोग्य-संवादाबद्दल खालील मुद्यांचे थोडक्यात विवरण या पुस्तिकेत केले आहे-
गावात, वस्तीमध्ये बैठका घेऊन आरोग्य-संवादासाठी तयारी कशी करायची?
गाव, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य-केंद्र, ग्रामीण रुग्णालय अशा विविध टप्प्यांवर कोणकोणत्या आरोग्यसेवा देण्याचे सरकारचे धोरण आहे?
या आधारे डॉक्टर्स व इतर आरोग्य-सेवकांशी कसा संवाद करता येईल?
या आरोग्य संवादाचा पाठपुरावा कसा करावा?
सरकारी सेवांची स्थिती व लोकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा याबाबत 'जनसुनवाई' हा कार्यक्रम का व कसा आयोजित करायचा?
खासगी डॉक्टरांशी आरोग्य संवाद कसा, कोणत्या मुद्दयांवर करता येईल?

जन आरोग्य अभियानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र सरकारने काढलेली दोन परिपत्रके, आरोग्य सेविकेच्या जबाबदाऱ्यांची माहिती देणारे शासकीय परिपत्रक, आरोग्य-संवादासाठी उपयोगी दोन पोस्टर्स असे परिशिष्ट व वरील मुद्यांबाबतचे मार्गदर्शन असलेली ही पुस्तिका महाराष्ट्रातील आरोग्य-कार्यकर्त्यांना, संघटनांना नक्की उपयोगी वाटेल व वापरली जाईल.

7 x 9.5, पृष्ठ संख्या - 48, प्रकाशन-2007, देणगी मूल्य - 20/-

 

करू आरोग्याची साथ! भाग - 1, 2

''आरोग्य-साथी' म्हणून गावपातळीवर आरोग्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्या जी कामे करणार आहेत त्याबाबतचे त्यांचे प्रशिक्षण करण्यासाठीची शास्त्रीय माहिती देणे पण अनावश्यक माहितीचा बोजा कटाक्षाने टाळणे, शास्त्रीय माहिती सोप्यात सोपी करून मांडणे, आरोग्याच्या प्रश्नांकडे जनवादी भूमिकेतून आणि स्त्री संवेदनशील दृष्टिकोनातून पाहणे ही या पुस्तकाची खास वैशिठये. पुस्तकातील पहिल्या भागात आरोग्य-साथींची कामे, आपण आजारी का पडतो?, औषधांची तोंडओळख, पोषण-कुपोषण याबाबतची मूलभूत समज देणारी प्रकरणे आधी आहेत. त्यानंतर जुलाब, रक्तपांढरी, ताप यामागे कोणते साधे आजार असतात, त्यांचे निदान, उपचार व प्रतिबंधन कसे करायचे याबाबत प्रकरणे आहेत. या प्रत्येक लक्षणांबाबत आरोग्य-साथीने नेमके काय करायचे व इस्पितळात केव्हा पाठवायचे हे नेमकेपणाने दिले आहे.

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात खोकला, पोटदुखी, यांच्यामागील साध्या आजाराचे निदान, उपचार व प्रतिबंधन कसे करावे, गंभीर लक्षणे-चिन्हे कशी ओळखावी याची माहिती आहे. त्यानंतर क्षयरोग, संधिवात इत्यादी काही गंभीर, चिवट नेहमीच्या आजारांची शंका घेऊन आजाऱ्याला कोणता सल्ला द्यावा याचे मार्गदर्शन आहे. शेवटच्या धडयांमध्ये जखमेला पट्टी, प्रथमोपचार, डोळयाचे व कातडीचे आजार, स्त्रियांचे खास आरोग्य-प्रश्न, व्यसने इत्यादी प्रश्नांबाबत जनजागृती, आरोग्य-साथींची वागणूक, ग्रामीण भागातील सरकारी आरोग्यसेवा, इ.बाबत मार्गदर्शन केले आहे. मागास दूरस्थ ग्रामीण भागातील कमी शिकलेल्या आरोग्य-साथींनाच नव्हे तर असे काम करणाऱ्या कोणत्याही आरोग्य कार्यकर्त्याला हे पुस्तक मोलाचे ठरेल.

भाग 1 व 2: 8.5 x 11' दोन रंगी छपाई, दुसरी आवृत्ती, देणगी मूल्य- 120/-
भाग 1 : पृष्ठ संख्या - 204/- , प्रकाशन - 2006
भाग 2 : पृष्ठ संख्या - 212/- , प्रकाशन- 2007

 

आरोग्य साथी भाग 1 व 2

अर्धशिक्षित/अशिक्षित कार्यकर्त्यांना किंवा आरोग्य कार्यकर्त्यांना 'आरोग्य-साथी' म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी हे चित्रमय पुस्तक आहे. खेडो-पाडी निवासी प्राथमिक आरोग्यसेवा मिळायची तर तिथे राहणारे आरोग्य कार्यकर्ते/आरोग्य-साथी हे त्यातील पहिला दुवा असले पाहिजे. 'डॉक्टरची गरज नाही' अशा साध्या आजारांवर सुरुवातीचा उपचार, मर्यादित पण योग्य प्रशिक्षणानंतर ते नीट करू शकतात असा ठिकठिकाणचा अनुभव आहे. गावात, पाडयातच केव्हाही उपलब्ध असणारी स्वस्त आरोग्यसेवा, लोकांच्या भाषेत आपुलकीचा आरोग्य सल्ला, आजार टाळण्यासाठी लोकांसोबत गाव सुधारणा इत्यादी कामे करणारे 'आरोग्य-साथी' मोठया प्रमाणात तयार होणे ही विशेषत: ग्रामीण भागाची नितांत गरज आहे. मागास दुर्गम भागात कमी शिकलेल्या/अशिक्षित स्त्रियाच या कामासाठी पुढे येतात. त्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रमाणभूत पुस्तक उपलब्ध नाही. ही उणीव भरून काढणारे, अनेक वर्गांच्या अनुभवावर आधारलेले हे पुस्तक.

अनावश्यक माहितीचा बोजा कटाक्षाने टाळणे, शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त सोपी करून चित्ररूपाने मांडणे, आरोग्याच्या प्रश्नांकडे जनवादी भूमिकेतून पाहणे ही या पुस्तकाची खास वैशिटये. पुस्तकातील पहिल्या भागात आरोग्य, आरोग्यसेवा, आजार व उपचार याबाबतची मूलभूत समज देणारी प्रकरणे आधी आहेत. त्यानंतर जुलाब, पोषण-कुपोषण, जखमेची काळजी व 'आपली वागणूक' हे विषय मांडले आहेत. दुसऱ्या भागात ताप, खोकला, पोटदुखी, रक्तपांढरी यांची विविध कारणे, त्यांचे निदान, उपचार व प्रतिबंधन याबाबत प्रकरणे आहेत.

मागास ग्रामीण भागातील कमी शिकलेल्या आरोग्य साथींनाच नव्हे तर असे काम करणाऱ्या कोणत्याही आरोग्य कार्यकर्त्याला हे पुस्तक मोलाचे ठरेल.
(भाग 1 व भाग 2 - 8.5 x 11, तीन रंगी छपाई, प्रकाशन- 2004,


देणगी मूल्य - 120/- (मराठी, हिंदी)
भाग- 1 : पृष्ठ संख्या - 95 , प्रकाशन- 2003 (हिंदी)
भाग- 2 : पृष्ठ संख्या - 116, प्रकाशन- 2000 (हिंदी)

 

Swasthya Sathi Part -1 in Hindi

Swasthya Sathi Part -1 in English

Opinion Poll on Private Health
care Marathi

 

 

मला रुग्ण हक्क माहीत आहेत, तुम्हाला?

खाजगी रुग्णालयातून आरोग्यसेवा घेताना रुग्ण म्हणून आपले कोणते हक्क आहेत हे रुग्णाला माहीत व्हावे यासाठी हे पोस्टर तयार करण्यात आले आहे. चांगली आरोग्यसेवा मिळावी, डॉक्टर व रुग्ण यांच्यामधील संबंध चांगले व्हावे, रुग्णांना त्यांच्या हक्कांसोबतच रुग्णांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून हे रुग्ण हक्कांचे पोस्टर 'रुग्ण हक्क समिती'करिता तयार करण्यात आले आहेत. 'रुग्ण हक्कां'ची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचावी म्हणून हे पोस्टर विविध ठिकाणी लावले जावेत यासाठी हे पोस्टर तयार केले आहे.

 

 

 

 

 

 

रुग्ण हक्कांचे संरक्षण चांगल्या रुग्णालयाचे लक्षण (रुग्ण हक्क पोस्टर्स)

खाजगी रुग्णालयांची सध्याची स्थिती साध्या शब्दात समजावी. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर रुग्णाला कोणते हक्क असतात व ते पाळले जाण्याची गरज आहे हे रुग्णांना त्यांच्या भाषेत समजावे ह्या दृष्टिकोनातून हे पोस्टर प्रदर्शन बनवण्यात आले आहे. या विषयीची सविस्तर माहिती पान क्रमांक 29 वर पाहावी.

फ्लेक्स प्रदर्शन (1.5 x 2 च्द्द.ढद्य.), 15 पोस्टर्स, (चार रंगी छपाई) देणगी मूल्य - Rs. 750
(पोस्टर हिंदीमध्ये सुध्दा उपलब्ध आहे.)

 

 

 

रुग्ण हक्कांचे पालन, चांगल्या हॉस्पिटलचे लक्षण

खाजगी आरोग्यक्षेत्राकडून आरोग्यसेवा घेताना रुग्ण म्हणून आपले काही हक्क आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये चांगली आरोग्यसेवा मिळावी, डॉक्टर व रुग्ण यांच्यामधील संबंध चांगले व्हावे, हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण हक्क पाळले जावेत म्हणून हॉस्पिटलमध्ये लावण्यासाठी हे पोस्टर तयार करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कोणत्या हक्कांचे संरक्षण व्हावे हे रुग्णाला कळावे यासाठी 'रुग्ण-हक्का'चे माहिती देणारे हे पोस्टर 'साथी'ने प्रकाशित केले आहे. रुग्णांच्या हक्कांबरोबरच या पोस्टरमध्ये रुग्णांच्या जबाबदाऱ्याही सांगितल्या आहेत.

 

 

 

 

 

 

खाजगी आरोग्यसेवेची दशा आणि दिशा(रुग्ण हक्क व खाजगी आरोग्यसेवेच्या प्रमाणीकरणाची गरज)

भारतातील खाजगी इस्पितळे, दवाखान्यांमध्ये मिळणाऱ्या सेवेचा दर्जा, रुग्ण हक्कांच्या पालनाची परिस्थिती यांचा परामर्श घेऊन ती आमूलाग्रपणे सुधारण्यासाठी कोणत्या दिशेने जायला हवे याचे विवेचन या पुस्तकात केले आहे. खाजगी आरोग्य क्षेत्राच्या वाढत्या व्याप्तीचा आढावा घेऊन त्याचे होणारे बाजारीकरण, शास्त्रीय उपचार कितपत केले जातात, रुग्ण हक्कांचे कितपत पालन होते हे उपलब्ध संशोधनाच्या आधारे मांडले आहे. याबाबतच्या असमाधानकारक परिस्थितीवर उपाय म्हणजे अनियंत्रित असे खाजगी आरोग्यसेवेचे सध्याचे स्वरूप बदलून प्रमाणित, नियंत्रित आरोग्यसेवेकडे वाटचाल करायला हवी अशी भूमिका मांडली आहे. डॉक्टरांच्या स्वःनियंत्रणाच्या व्यवस्थेचा परामर्श या पुस्तकामध्ये घेतला आहे. सर्वांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी काही विकसित देशांप्रमाणे भारतात सार्वत्रिक आरोग्य विमा योजना राबवावी. खाजगी डॉक्टरांनी प्रमाणित सेवा दिली तर त्यांना सरकारी निधीतून प्रमाणित दराने त्याचे पैसे द्यावे अशी व्यवस्था कशी निर्माण करता येईल हा नवा मुद्दा या पुस्तकात मांडला आहे. सरकारी सवलत घेणाऱ्या 'धर्मादाय' इस्पितळ खाजगी इस्पितळांप्रमाणेच वागतात याकडे या पुस्तकात लक्ष वेधले आहे. अशा इस्पितळांनी गरीब व कमकुवत आर्थिक गटातील लोकांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी 20टक्के खाटा राखीव ठेवण्याचे बंधन मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या तपशीलवार आदेशात कसे घातले आहे आणि या आदेशाची अंमलबजावणी होत आहे का? हे ठोसपणे मांडले आहे. रुग्णांचे मानवी हक्क डॉक्टरांनी का जपले पाहिजेत, हे हक्क नेमके कोणते, त्यांना कायदेशीर स्वरूप का हवे, इ. विषयी 'जन आरोग्य अभियान'ने केलेल्या प्रयत्नाची माहिती तसेच डॉक्टरांच्या संघटनांसोबत रुग्ण हक्क समितीच्या प्रयत्नामुळे एका टप्प्यापर्यंत रुग्ण हक्कांबाबत सामंजस्य कसे निर्माण झाले याची माहितीही या पुस्तकात आहे.

खाजगी आरोग्यसेवेवर विश्लेषणात्मक प्रकाशझोत टाकून सुधारणा सुचवणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे. सर्व जिज्ञासू वाचक व सामाजिक कार्यकर्ते यांना ते आवडेल असा विश्वास आहे.

7 x 9.5, पृष्ठ संख्या - 113, प्रकाशन-2010, देणगी मूल्य ठ 50/-

 

 

Twenty Questions and Answers on A System for Universal Health Care, What is it? How can we hope to achieve it?

This booklet answers 20 key questions on Universal Health Care (UHC). It explains how good quality, appropriate Health Care which is free at the point of service, can be made available to everybody in India within the coming decade or so.
This booklet first explains basic concepts like what is exactly meant by Universal Health Care; what are the core principles of UHC etc.

It then turns to the experiences of various countries (including some developing countries) of moving towards the goal of UHC and basic requirements as regards financing, provisioning, governance, which have to be fulfilled to realize the goal of UHC.

Lastly, the booklet discusses the specificities of the Indian situation, including the need to strengthen, expand the Public Health System and to regulate the private providers. This last section also discusses the first steps that need to be taken in face of the huge challenges we face in India along the road to 'Health Care for All', which is part of the larger goal of 'Health for All'.

Various pro-people bodies working on health issues like Jan Swasthya Abhiyan have been advocating since 2000, 'Health and Health Care for All' in India. Now Universal Health Care has begun to figure in the official agenda. Perhaps as a preparation for the next Lok Sabha election in 2014, the Prime Minister's Office fostered the appointment of a 'High Level Expert Group' (HLEG) by the Planning Commission to prepare a 'blueprint' for achieving Universal Health Coverage in India by 2020. With Universal Health Care developing into an important national issue, this booklet would be of interest to a wide audience, including health activists, health professionals, researchers, trade unionists, journalists and social-political activists. 

5.5'' x 8.5'', pgs-56, published in 2012, contribution price - 40/-

 

 

वीस प्रश्नोत्तरे... सर्वांसाठी मोफत आरोग्य सेवा म्हणजे काय? ती कशी प्रत्यक्षात आणता येईल?

सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा याविषयी नेहमी विचारले जाणारे 20 प्रश्न व त्यांची उत्तरे या पुस्तिकेत आहेत. 'सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा' म्हणजे काय? त्याची मूलभूत तत्त्वे, आज भारतात त्याबाबत सुरू असलेली चर्चा या प्रश्नांचा ऊहापोह केल्यानंतर 'सर्वांसाठी आरोग्यसेवा' ही व्यवस्था ज्या विकसित व काही अविकसित देशांनी यशस्वीरित्या अंगीकारली आहे त्यांच्या अनुभवांकडे पुस्तिका वळते. तसेच 'सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा' उभारण्यासाठी लागणारा निधी, आरोग्यसेवा पुरवण्याची व्यवस्था, तिचे नियोजन व नियंत्रण यांचा आढावाही पुस्तिकेत घेतला आहे.

भारतीय परिस्थितीची वैशिटये लक्षात घेता 'सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा' प्रत्यक्षात आणायची असेल तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणांचा विस्तार व त्यांचे बळकटीकरण तसेच खाजगी आरोग्य क्षेत्राच्या नियंत्रणाची गरज हे स्पष्टकरते. ही व्यवस्था अस्तित्वात येण्यासाठी प्रचंड आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कोणती पावलं उचलावी याचं दिग्दर्शन शेवटच्या भागात केलेलं आहे. 'सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा' भारतात आणण्यासाठी 2000 सालापासून जन स्वास्थ्य अभियान व विविध जनवादी संघटना कार्यरत आहेत. आता 'सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा' ही संकल्पना सरकारी स्तरावरही विचारात घेतली जाऊ लागली आहे. कदाचित 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग असेल, पण पंतप्रधानांच्या कार्यालयाने पुढाकार घेऊन नियोजन मंडळाच्या एका उच्चस्तरीय तज्ज्ञांची समिती (एच.एल.ई.जी.) तयार करून 2020 पर्यंत भारतात 'सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा' कशी आणता येईल याचा आराखडा तयार करण्याचे काम दिले. या समितीच्या अहवालातील शिफारशींवर आधारित बाराव्या पंचवार्षिक योजनेत आरोग्यसेवेचा आराखडा नियोजन मंडळाने मांडला आहे. त्यात काही विवादास्पद मुद्दे आहेत. या पार्श्वभूमीवर 'सर्वांसाठी मोफत आरोग्यसेवा' हा राष्ट्रीय पातळीवरील एक महत्त्वाचा विषय झाला आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व या क्षेत्राशी संबंधित सर्वच इच्छुक व कार्यकर्त्यांना ही पुस्तिका नक्कीच उपयोगी ठरावी.

 

  << Privious Page

 

Anusandhan Trust

Anusandhan Trust, a public trust registered under the Bombay Public Trust Act, 1950, (Registration No: E-13480), runs two centres namely: CEHAT based in Mumbai and SATHI in Pune.
read more...

Media Gallery